
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
जुनी पेन्शन — सुरक्षित भविष्याचा आधार
कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी, सन्मानपूर्वक जीवनमानासाठी आणि पेन्शनविषयक योग्य माहितीच्या प्रसारासाठी एकत्रित प्रयत्न. जुनी पेन्शन योजना, शासन निर्णय आणि कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती एकाच ठिकाणी.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
सुरक्षित भविष्य, सन्मानाने आयुष्य..
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
आम्ही महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, महाराष्ट्र शासनाच्या कर्मचारी /श्रमिक संघ कल्याण योजनेचा एक अंग आहोत. राज्यातील शासकीय, निमशासकीय व खाजगी कर्मचारी व अधिकारी तसेच राज्यातील जुनी पेन्शन (महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ व म.ना.से. अंशराशीकरण १९८४) लागू नसलेले नोकरदार म्हणून काम करणा-या शासकीय निमशासकीय व खाजगी व्यक्तींची संघटना करणे आणि त्यांना एकत्रित आणणे आणि त्यांचे शासन व प्रशासनाशी संबंध विनियमित करणे. त्यासोबतच सदस्यांना त्यांच्या जिवनमानात आणि सेवेत सुस्थिती प्राप्त करुन देणे. तसेच त्यांच्या अडचणी दूर करण्यास मध्यस्थी करणे व १९८२-८४ ची जुनी पेन्शनचा लाभ मिळवून देण्याच्या उद्दिष्टासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत आणि असू.
आपला माहिती मंच
निवृत्तीवेतन हे केवळ आर्थिक लाभ नसून दीर्घकाळ सार्वजनिक सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वृद्धापकाळातील स्थैर्याशी संबंधित विषय आहे. आमच्या मिशन आणि व्हिजन मध्ये राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी कर्मचारी व अधिकारी यांची म.ना.से. अधि 1982 व 84 अंतर्गत जुनी पेन्शन अबाधित ठेवणे आणि जुनी पेन्शन लागू नसलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पूर्ववत लागू करणे यावर लक्ष केंद्रित करीत आहोत. त्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या पेन्शन , वेतन तसेच सेवा विषयक समस्या सोडवून त्यांना आणि त्यांच्या परिवाराला उत्तम जीवनमान आणि सुरक्षित भविष्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे. यासाठी मार्गदर्शन, जाणीव जागृती आणि शासन – प्रशासनासोबत सबंध व मध्यस्थी करीत करतो.
📘जुनी पेन्शन योजना
OPS ची मूलभूत संकल्पना, संबंधित नियम आणि पात्रतेसाठी तपासायच्या बाबी जाणून घ्या
⚖️ OPS / NPS / UPS तुलना
योजनांच्या मूलभूत रचनेतील फरक समजून घ्या आणि लागू अधिकृत नियम तपासा.
📄 शासन निर्णय (GR)
मूळ अधिकृत स्रोताशी पडताळलेले शासन निर्णय आणि परिपत्रके स्वतंत्र विभागात.
🧭 कर्मचारी मार्गदर्शक
नियुक्ती तारीख, सेवा प्रकार, कागदपत्रे आणि विभागीय कार्यालयात विचारायचे प्रश्न.
📰 बातम्या व अपडेट्स
माध्यमांतील बातम्या आणि संस्थेच्या सूचना अधिकृत GR पासून वेगळ्या.
❔ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
OPS, NPS, UPS,पात्रता, अधिकृत स्रोतांविषयी सामान्य प्रश्नांची उत्तरे
पेन्शनचे महत्त्व
निवृत्ती उत्पन्नाचा विचार करताना आर्थिक स्थैर्य, महागाई, आरोग्यखर्च आणि कुटुंबाची सुरक्षितता यांचा एकत्रित विचार महत्त्वाचा आहे.
आर्थिक स्थैर्य
निवृत्तीनंतर दैनंदिन खर्चाचे नियोजन करण्यासाठी नियमित उत्पन्न महत्त्वाचे ठरू शकते.
आरोग्य व महागाई
वयानुसार आरोग्यखर्च आणि महागाईचा परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे.
कुटुंबाची सुरक्षितता
पात्र कुटुंबीयांसाठी लागू नियमांची माहिती महत्त्वाची आहे.
कार्यकारिणी

9405383284

राज्यसचिव
9730948081

राज्यकार्याध्यक्ष
7775938511

राज्यकार्याध्यक्ष
8898880222

राज्य सल्लागार
8275397373

राज्यकोषाध्यक्ष
9767828283

राज्यकोषाध्यक्ष

महिला आघाडी राज्य प्रमुख

राज्य उपाध्यक्ष
सामान्य प्रश्न
जुनी पेन्शन योजना प्रत्येक कर्मचाऱ्याला लागू आहे का?
नाही. पात्रता नियुक्तीची तारीख, भरती जाहिरात, सेवा प्रकार आणि लागू शासन निर्णयांवर अवलंबून असते.
OPS आणि NPS सारख्या योजना आहेत का?
नाही. त्यांच्या रचनेत, योगदान पद्धतीत आणि लाभांच्या गणनेत फरक असू शकतो.
नावनोंदणीमुळे पेन्शन लाभ निश्चित होतो का?
नाही. वेबसाइटवरील नावनोंदणी सहभाग आणि संवादासाठी आहे; ती लाभाची हमी नाही.